Sunday, August 22, 2010

घर .. कौलारु

हिरव्या हिरव्या शेतात


तांबडया मातीची पायवाट

नारळ पोफळीच्या बनात

वेळु पानांचीच छाया दाट



वरती निळे आकाशाचे छत्र

शेजारी खळ्खळणारा ओढा मित्र

भाताच्या झिलई वर नाचे

वारयाची पिसाट स्वारी

त्यावर उतरे अनेक

चिमण्या पक्शांची रंगीन वारी

... अशा शुभंकर केवडी उन्हात..



चमके माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



घरी उंबरठयावर जाईचा

नाचे चंद्रवेल

त्या शेजारी दाटे

निशिगंधाचा परिमल

पुढे अंगणात पडतो

शुभ्र प्राजक्ताचा सडा

तिथे वाकड्या उंच

नारळाचा पहारा खडा

तो राजव्रक्श सोनचाफा

उभा कसा ताठयात

राजस सुगंधाचा तो

देई सर्वा परिपाठ...

... अशा भोवळ सुवासांच्या अमोघ घंघाळात...



... महके माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



अंगणात घडे रोज

प्रात: सडा संमार्जन

त्यावर उमटे नक्शीदार

लोभस रांगोळी छान

दरवाजा संमुख असे

सुभग तुळशी व्रुंदावन

क्रष्ण मंजरीच्या त्या

सुगंधी आंतर महालात

रुक्मीनी आडवी

क्रष्णाची प्रेमवाट

शेजारी गुलाब फांदीवर

उभी राधा सुस्नात

टाकी निरव प्रेमाचा

क्रष्णावरी लोभस कटाक्श

परी लक्श क्रष्णांचे

मिरेच्या श्रांत भजनात

... अशा गोधुळ ..गोरस वेळी..



... स्वप्नाळलेले माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



घरात शिरता सोप्यात

उभा गणेश आर्शिवचन

त्या शेजारी उभा

श्वानासह दत्तात्रय छान

माता एकविराच्या दर्शनाची

लटके आठवण ती भिंती

जाई काजळ घालुन ती

नटी मिरवते गॊरकांती

सारवलेल्या बॆठकी पल्याड

देवघराची वसते शांती

कुलस्वामिनी देवी भोवती

इतर देवांचा फेरा घाटे

समोर यग्यकुंडासह

धुप दिप नॆवद्य दाटे

बाजुच्या माजघरातील

कांकणे आवाज काढी

भिंतीला उभी रवी

अन मडक्यांची उतरंडी

शिंक्यातील लोणी पाही

खट्याळ मांजराची वाट...

...अशा सुरम्य वेळी ..



...त्रप्त माझे....

घर कौलारु...

घर कौलारु...



धान्यांची भरती कणगी

शेणीने सारवलेल्या

त्याला रेलुन बसल्या

पोत्यांच्या उभा राशी

तिथे मांडती संसार

फळाच्या मग डाली

अशा कोठारात मग

उंदराची उगीच उठबॆस

त्यांना वाटते भिती

अवचित बोक्याची खास

.. अशा .. लेकुरवेळी ....



... संपन्न माझे ..

घर कौलारु...

घर कौलारु...



माजघराशेजारी असे

खोली निजण्याची

तिथे वसे बाज

सुख दु:खांच्या विणीची

त्यावर निजे माझी

म्हातारी आई छान

तिच्या जवळ नित्यही

सुख दु:खांच्या आठवणीची खाण

आढयाकडे बघत ती

करते नामसंकिर्तन

तिच्या मायेच्या

उबेवर उभे ..



हे घर माझे ..

घर कौलारु...

घर कौलारु...