Sunday, August 22, 2010

घर .. कौलारु

हिरव्या हिरव्या शेतात


तांबडया मातीची पायवाट

नारळ पोफळीच्या बनात

वेळु पानांचीच छाया दाट



वरती निळे आकाशाचे छत्र

शेजारी खळ्खळणारा ओढा मित्र

भाताच्या झिलई वर नाचे

वारयाची पिसाट स्वारी

त्यावर उतरे अनेक

चिमण्या पक्शांची रंगीन वारी

... अशा शुभंकर केवडी उन्हात..



चमके माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



घरी उंबरठयावर जाईचा

नाचे चंद्रवेल

त्या शेजारी दाटे

निशिगंधाचा परिमल

पुढे अंगणात पडतो

शुभ्र प्राजक्ताचा सडा

तिथे वाकड्या उंच

नारळाचा पहारा खडा

तो राजव्रक्श सोनचाफा

उभा कसा ताठयात

राजस सुगंधाचा तो

देई सर्वा परिपाठ...

... अशा भोवळ सुवासांच्या अमोघ घंघाळात...



... महके माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



अंगणात घडे रोज

प्रात: सडा संमार्जन

त्यावर उमटे नक्शीदार

लोभस रांगोळी छान

दरवाजा संमुख असे

सुभग तुळशी व्रुंदावन

क्रष्ण मंजरीच्या त्या

सुगंधी आंतर महालात

रुक्मीनी आडवी

क्रष्णाची प्रेमवाट

शेजारी गुलाब फांदीवर

उभी राधा सुस्नात

टाकी निरव प्रेमाचा

क्रष्णावरी लोभस कटाक्श

परी लक्श क्रष्णांचे

मिरेच्या श्रांत भजनात

... अशा गोधुळ ..गोरस वेळी..



... स्वप्नाळलेले माझे...

घर कौलारु...

घर कौलारु...



घरात शिरता सोप्यात

उभा गणेश आर्शिवचन

त्या शेजारी उभा

श्वानासह दत्तात्रय छान

माता एकविराच्या दर्शनाची

लटके आठवण ती भिंती

जाई काजळ घालुन ती

नटी मिरवते गॊरकांती

सारवलेल्या बॆठकी पल्याड

देवघराची वसते शांती

कुलस्वामिनी देवी भोवती

इतर देवांचा फेरा घाटे

समोर यग्यकुंडासह

धुप दिप नॆवद्य दाटे

बाजुच्या माजघरातील

कांकणे आवाज काढी

भिंतीला उभी रवी

अन मडक्यांची उतरंडी

शिंक्यातील लोणी पाही

खट्याळ मांजराची वाट...

...अशा सुरम्य वेळी ..



...त्रप्त माझे....

घर कौलारु...

घर कौलारु...



धान्यांची भरती कणगी

शेणीने सारवलेल्या

त्याला रेलुन बसल्या

पोत्यांच्या उभा राशी

तिथे मांडती संसार

फळाच्या मग डाली

अशा कोठारात मग

उंदराची उगीच उठबॆस

त्यांना वाटते भिती

अवचित बोक्याची खास

.. अशा .. लेकुरवेळी ....



... संपन्न माझे ..

घर कौलारु...

घर कौलारु...



माजघराशेजारी असे

खोली निजण्याची

तिथे वसे बाज

सुख दु:खांच्या विणीची

त्यावर निजे माझी

म्हातारी आई छान

तिच्या जवळ नित्यही

सुख दु:खांच्या आठवणीची खाण

आढयाकडे बघत ती

करते नामसंकिर्तन

तिच्या मायेच्या

उबेवर उभे ..



हे घर माझे ..

घर कौलारु...

घर कौलारु...

Wednesday, June 23, 2010

कविते ! .....अग लाड्के.. तु अशी कशी ग... अशी कशी


तु हिमालयाचे बर्फाळ टोक...

कि धबधबयातील सप्तरंगी इंद्र्धनु...

तु कातिकेची श्रीमंत पुनव...

कि आशाडातिल ढ्गाची दाटी...

तु ओढ्यातील खळाळ पाणी...

कि हेमंतातील प्राजक्त्ती दव...

तु रेताड विस्तिर्ण माळरान...

कि निळे अफाट आकाश...

तु आशाडातील पहिला पाउस...

कि श्रावणातील खट्याळ रिप रिप...

तु चांद्णवेलीतिल निळी चंद्रकोर...

कि गुलाबावरील अबोल अश्रु...



कविते ! .....अग लाड्के.. तु अशी कशी ग... अशी कशी





तु ग्यानियाची अम्रतवाणी...

कि तुकयाचे अविट अभंग...

तु मिरेची अथांग विराणी...

कि कबिराच्या दोह्यातिल शहाणपण...

तु रामदासाचा ’उदासबोध’...

कि मोरोपंताची ’केकावली’...

तु बोरकरांची ’चांद्णवेल’...

कि कुसुमाग्रजांची ’हिमरेशा’...

तु केशवसुतांची ’तुतारी’...

कि बालकविचा वेडा ’औदुंबर’...

तु पाड्गावकरांची ’धारान्रुत्य’ छोरी...

कि भटाचा आपलाच ’एल्गार’...

तु आरती प्रभुचे ’नक्शत्राचे देणे’...

कि ग्रेसची ’सांजभयाची साजणी’





कविते ! .....अग बाई.. तु अशी कशी ग... अशी कशी



तु विश्णुच्या क्शिरसागरातील ब्रम्हकमळ...

कि येशुच्या चेहरयावरील ख्रिश्ती वेदना..

तु रणविराच्या तलवारीचे टोक...

कि स्वातंत्र्यविराच्या हौतात्म्यातिल त्याग...

तु कामगाराच्या माथावरील घाम...

कि समाजपुरुशांच्या मनावरील ताण

तु उपासमारीतील मातेच्या नयनातील अश्रु....

कि बोस्नियातील संघर्शाची ठिणगी

तु वसुंधरेचा ग्रिनहाउस इफेक्ट

कि अणुशस्त्र स्पर्धेतिल छुपे संधान



कविते ! .....कंब्खत.. तु अशी कशी ग... अशी कशी



तु प्रेयसिच्या गालावरची लाली

कि नयनातील ते विभ्रम

तु उर्जस्वल स्वप्नांची पहाट

कि वेदनेची सायंकातरवेळ

तु भावनांचा उस्फुर्त आविश्कार

कि शब्दाचा केवळ अवडंबर

तु नवऊन्मेश विलासी प्रतिभा

कि त्याचाच सलिल अविश्कार

तु भावसत्याची पुर्ननिर्मिती

कि भाससत्याचे धारान्रुत्य

तु केवळ प्रतिमांची भाशा

कि प्रतिमांची शुभ्र चांदरात



कविते ! .....अग वेडे.. तु अशी कशी ग... अशी कशी

परिमाणाचे गणित

परिमाण हाच सर्व व्यवहाराचा आत्मा... त्यास टाळू मी कसे ?


मग वारेमाप दु:खाचा हिशेब ..... मी बरा मांडु कसे ?



गणिताने विग्याण व्यापिले ..... व्यापले आवघे भौतिक

वेदना व करूणेचे परिमाण ..... हया गणिताने मांडु कसे ?



अंकाने विश्व व्यापिले ..... परिगणकाने अर्थशास्त्र

सौंदय व उदारतेचे संख्याशास्त्र .... मी बरे उलगडु कसे ?



संख्येचे संख्याशास्त्र .... ही तर लोकशाहीची अर्थवत्ता

पापाच्या बाजारात ..... मी पुण्याचा हिशेब मांडु कसे ?



जो जो विषय मी निवडला ... त्यात गणिताचे तर्कशास्त्र

व्यवहाराच्या ह्या बाजारात .... निष्टा व भक्तीचा तर्क मी जाणु कसे ?



आप्त मित्र स्वकिय सारे.... केवळ जाणतात अर्थशास्त्र

संधी साधुपणाचे त्यांचे सारे .... तर्कशास्त्र मी जाणु कसे ?



प्रेमामागे हिशेब ...हिशेबामागे ही प्रेम

मी माझ्या वेड्या प्रेमाचा ... तुच सांग हिशेब मांडु कसे ?

हिरवी ज्वाला

विराट उन्हात शोधतो मी


एकच लुकलुकणारा वेडा तारा

कोवळ्या उन्हात पुन्हा शोधतो

धुमसणारी हिरवी ज्वाला



श्रमलेल्या प्रत्येक मातेत मी

शोधतो माझी वेडी आई

श्रूंगारलेल्या प्रत्येक नवरीला

विचारतो " होशिल कां माझी बाई ..?"



उसासणारे प्रत्येक फुल

आठवण गोंजारते तिच्याच ह्र्दयाची

झाडावरील वाळलेले पान

हुल देते मला शिशिराची



सर्व वाटा मला खुणावती

मोडून माझीच जिवनवाट

अन .. माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर

तवंगंते निराशेची साय दाट



आता बस खेळ उन पावसाचा

पिंजारणार किती खुळी निराशा

अन.. निराशेच्या क्रुष्णविवर गर्तेत

आत्म्याला ... अमरत्वाची वेडी आशा

Sunday, May 23, 2010

धुक्यात आलीस भल्या पहाटे

धुक्यात आलीस भल्या पहाटे
नक्षत्राचे झुम्बर घेउन
मिलनाच्या त्या संकेतावर
गेलीस हळूच फूली मारून

धुक्यात आलीस भल्या पहाटे
गालावर दवबिंदू घेउन
दवबिंदू मिठीत द्रवताना
का बारे गेलीस निमिष नयनातुन

धुक्यात आलीस भल्या पहाटे
स्वप्नाचा गजरा माळुन
स्वप्नांतिल तो गोड लालिमा
उधळत जातेस माझ्या कळ्यांतुन


 
धुक्यात आलिस भल्या पहाटे
प्रेमाचे अभिवचन घेउन
आट्यापाट्याच्या त्या खेळांत
आपण जातो का बरे गुंतुन


 
मग धुक्यात आलिस एके पहाटे
नयनी अश्रुंवर संयमाचा पहारा
मग घोघरया आवाजात स्त्रवतो
तो कातिल वेदनेचा निखारा


 
धुक्यात आलिस मग का.. पहाटे
उभ्या स्वप्नांच्या मग उध्वस्त धर्मशाळा
एकाटाच पारवा का घुमतो आहे
मग कापीत काळांच्या कातरवेळा...

स्मित


ती गुबगुबीत नवयौवना


भुर्रकन द्रश्टी पल्याड जाते

वळणावर वळण घेउनी

ती इकडेच पायउतार होते



हलकेच तिने वाकताना

तिचा पदर गाफिल ढळतो

त्या गाफिल क्शणाच्या झटती

मग जीव खालीवरती होतो



नजरेची तिची प्रत्यंचा

जिव ..शेवरी...शेवरी करतो

परंतु तिच्या नजरेत

ओळखिचा लवलेश ही नसतो



वैशाखी ही घनी कपारी

एक ..कातळ..कातळ...स्त्रवतो

परि ना हिच्या ह्र्दयी

स्नेहाचा कोंभ ना फुटतो



असे आता नेहमिच होते

रोज शिळ वाय्रावर उधळते

परि..मन..त्या गोड मधात

स्त्रवुन...स्त्रवुन ..उगीचच झडते



परि एक असा ही दिस उजाडतो

ती हळुच अनवट स्मित फेकते

माझ्या.. हर... शेवरी देहात

मन ..वासरु ..चौखुर उधळते.






 



Friday, April 23, 2010

निळवंती

क्शितिजावरुन पक्सी उडाले
संध्याकालच्या या समेवर
कोलाहालातच आयुश्य विरले
त्या क्शणांच्या या कलेवर

काळोखाच्या गर्तेत उतरती
निळवंताची आयुश्य गाणी
काळोखात निपचित पडली
त्या पक्शांची रागरागिणी

काळोखाने घड्वुन आणला
त्या खगांचा कुटुंबमेळा
लहान थोराची मग उठबस
खोप्यातच तो करुन गेला

काळोख पिऊनी...काळोखातच गाईली
त्यांनी आपली प्रेमकहानी
मात्र त्या एका पारंबीवर
साळुंखी गाई मिरेची विराणी

उश:कालच्या एका आशेवरती
पक्शी रचती सुक्ते दि:कालाची
दिवसभराच्या स्वातंत्र्यासाठी
घेती रात्री अंधार उशासी.

Wednesday, April 21, 2010

मरणगंध

मी भर दुपारी हिंडतो
सारे रेगिस्तान स्मरते
पण त्या ही वाळवंटात
मृगजल कुठे नाहीसे होते


मग मी जातो गुत्यात
तिथे ओमर खय्याम भेटतो
मरणाचा तोचि आकांत
तो नव्याने पुन्हा मांडतो


मग मी फिरुन संध्याकाळी
जिव टांगणीला ठेवतो
उद्याच्या मरण यात्रेची
आजच तयारी करतो

मी मरतो मग निश्चयाने
सारा प्लान च उघडा करतो
मग सारे आप्तस्वकीय
इकडून तिकडून गोळा करतो

माझ्याच मरणाचा मग
ते हिशेब मला विचारी

मग मी प्रत्येकाला हिशेबाने
ज्याचा त्याचा वाटा देतो
मग ते हळुच मला विचारी
थाबणे आवश्यक आहे...॓
उठवित आपली मरण पालखी
मग मी सर्वाना निरोप देतो
स्मशानातिल हि सारी व्यवस्था
मी चोख बजावित असतो
सरणावर मी चढताना
लाकडे व्यवस्थित करुन घेतो...
अन मण्त्राग्नीच्या उच्चाराआधीच
पलित्यावर तुप वाढुन घेतो
आता उगीच उशीर कशाला
मरताना का गोमुत्र लागते
मग मी माझ्याच रक्ताचा
स्वत: अभिषेक करुन घेतो
मी मरतो शान्त चित्ताने
माझी चित्ता किती डौलदार
येणारा जाणारा मग म्हणतो
काय सुरेख मेला फ़किर...
तरी ही जीव माझा अडकतो
माझ्याच रिकाम्या घरट्यामध्ये
मी पुन्हा माघारी फिरतो
मरणदिप पेटविण्याआधी...
माझ्या मरणदिपा मध्ये
मी स्वत:ला वितळवित बसतो
माझ्याच मरणगंधाचा हा
मी असा सोहळा करतो

Tuesday, April 20, 2010

इरानी स्वप्नातील रात

ती स्वप्नातील रात इरानी वेडी
सरसर उतरून जाय पहाटे
ती धग उराशी अजुन जिवंत
ती चुड हाडाशी लावून जाते

ते खट्याळ डोळे, लाडिक हात
...आठवतात... परत..परत
तो संवादी सुरांचा फेर
घाली रुंजी...खोल धुक्यात

ते रुसवे... ते फुगवे...
ते विभ्रम...अन मनातील संभ्रम
ती आर्त मनातिल आस
काळोखात....जणु चांदण्याची बरसात

ती घार उडे आकाशी
सावज उगी हरखुन जाते
जे न उमगले मला कधी ही
ओठातुन उस्फरु्ण येते

..अन हे सर्व आठवुन आता ही
मन...उगाच वेडेपिसे होते
नजरेला प्रतिक्शा त्या क्शणाची
मन...उगाच दिसी स्वप्न चाळवते

आता एकच आस... डोळ्यांची
मन....दिठीत...झपुर्झा होते.