Wednesday, June 23, 2010

हिरवी ज्वाला

विराट उन्हात शोधतो मी


एकच लुकलुकणारा वेडा तारा

कोवळ्या उन्हात पुन्हा शोधतो

धुमसणारी हिरवी ज्वाला



श्रमलेल्या प्रत्येक मातेत मी

शोधतो माझी वेडी आई

श्रूंगारलेल्या प्रत्येक नवरीला

विचारतो " होशिल कां माझी बाई ..?"



उसासणारे प्रत्येक फुल

आठवण गोंजारते तिच्याच ह्र्दयाची

झाडावरील वाळलेले पान

हुल देते मला शिशिराची



सर्व वाटा मला खुणावती

मोडून माझीच जिवनवाट

अन .. माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर

तवंगंते निराशेची साय दाट



आता बस खेळ उन पावसाचा

पिंजारणार किती खुळी निराशा

अन.. निराशेच्या क्रुष्णविवर गर्तेत

आत्म्याला ... अमरत्वाची वेडी आशा

No comments:

Post a Comment