Sunday, May 29, 2011

ती ... अन डोळे

मी तुझ्या थेट डोळ्यांमध्ये पाहतो


.....अन....तु ही माझ्या....

असे किती दिवस तरी चालु राहते

काही विशेष बोलण्याची

व्यक्त करण्याची आवश्यकता वाटतच नाही

..कारण...डोळेच साधतात सर्व संवाद

...सर्व स्वरांचा मेळ ....

नक्शत्रांचे विभोर न्रुत्य..

आशा निराशांचा लपंडाव..

अन डोळ्यातच दाटते

आश्वासक प्रेमाची प्रकाशवाट

अन मग चालु राहतो शोध

एकमेकाच्या अस्तित्वाचा एकमेकाच्या डोळ्यात ...



कारण...

डोळ्यांनाच अंग फुटते

अन फुटतात सह्स्त्र डोळे

सुर्यातुन हजार सुर्य बाहेर पडावे तसे ..

अन होते मग फक्त .. होरपळ..

वेदनेची अन अंगाची ही...

ही वेदना जाळ्त असतांनाच ..

विरहाची माय गर्भार होते

अन .. तिला डोहाळे होतात

एकमेकापासुन दुर जाण्याचे

विरहात जळ्तांना ही ...

का कोणास ठाऊक ..

संन्यस्त व्रुत्तीचा नाग

मनाला डसुन जातो ...



अन ...

मग तु दूर निघुन जाते ...

पण दिसतात ते डोळे ..

अन तु कुठे तरी दिगंतात लोंबकळ्तांना

आठवणींचे पक्शी घिरट्या घालतात

अन .. मारतात चोंच

त्याच त्याच जखमेवर



का .. करुन घेतली आम्ही आत्मवंचना

जगाला कळण्याआधीच ..

सत्याला सामोरे जाण्याची ताकद

नव्ह्ती की .... एकूणच आयुष्याच्या

क्शणभंगुरतेची किड तेव्हांच

दबा धरुन बसली होती मनांत ..

कि मनाला होती ...

अमोल ... तरल... पवित्र प्रेमाला

व्यवहाराची चुड लावून

करपू न देण्याची

एकाकी ओढ ...



आता सकाळ संपुन माध्यान्हिचा सुर्य

केव्हांच उतरणीला लागलाय ..

तेव्हां मनावरील सर्व गाळ बाजुला सारल्या जातो

अन वॆषम्य वाटते व हसु ही येते

स्वत:च्या मनातील उन सावलीच्या खेळाचे



पण... अजुनही तसे डोळे दिसले कि ...

तुच पुन्हा दिसायला लागते ...

अन ... शोधत राहतात .. तेच डोळे

... त्याच डोळ्यातील ... आसवांचे तळ ...

..... निरंतर .... !





सुधाकर

No comments:

Post a Comment