Sunday, May 29, 2011

हिरवे शेत

हिरव्या चिंचा ... हिरवे रावे


हिरव्या शेतात ... मन गुंतावे



हिरव्या शेताला ... हिरवी पायवाट

बांधावर उभी ... हिरवी बाभुळ ताठ



खोल खोल विहिरीला .. पायय्रा एकूण चाळीस

नितळ शुभ्र पाण्यात ... आसरा मात्र कासाविस



दांडाच्या पाण्यावर ... माजते उसाचे रान

अन शेजारीच उभा ... सुर्यफुल मात्र छान



सरळ मोठ्या बांधावर ... वेडी बाभुळ उंच

तिला खुणावते मग ... शेजारचीच चिंच



कवठाच्या झाडाला ... कवठे लागतात उंच

लिंबाच्या झाडावर मात्र ... वानरेच पंच



भुईमुगाच्या पिकावर ... वानराचा डोळा

गव्हाच्या ओंब्यासाठी ... उंदरे होती गोळा



ज्वारीच्या शेतात मामा ... गोफण घेऊन उभा

त्याला पाहुन करतात ... पाखरे ह्ळूच तोबा



ज्वारीच्या खळ्याला ... रात्रीचा पहारा

थंडीच्या दिवसात मात्र ... शेकोटिचा सहारा



माचणावरील अंथुरणात ... टोचे गवत फार

पहाटेच दवेचा खावा ... गपगार ओला मार



अशा हिरव्या शेतात ... माल होतो खंडीने

मग मामा जातो घरी ... माल घेऊन बंडीने



सुधाकर

No comments:

Post a Comment